नवी दिल्ली/मुंबई (Har Ghar Tiranga 2024) : भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य (Independence Day) मिळाले. भारत स्वतंत्र होऊन 77 वर्षे झाली आहेत. याही वर्षी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम 9 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाली असून, ही तिसरी आवृत्ती आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक देशवासीयांना 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘जसा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, आपण पुन्हा एकदा प्रत्येक घरात तिरंगा एक संस्मरणीय जनआंदोलन बनवूया.’
पीएम मोदींनी पुढे लिहिले की, मी माझे प्रोफाइल पिक्चर बदलत आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही असेच करा आणि आमचा तिरंगा साजरा करण्यात माझ्यासोबत सहभागी व्हा आणि हो तुमचा सेल्फी harghartiranga.com वर शेअर करा. एवढेच नाही तर तुम्ही ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) प्रमाणपत्रही ऑनलाइन डाउनलोड करू शकता. या मोहिमेत सहभागी होणे खूप सोपे आहे. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर आणि तुमचा सेल्फी अपलोड केल्यानंतर, तुम्ही तुमचे प्रमाणपत्र सहज तयार आणि डाउनलोड करू शकता. हा उपक्रम प्रत्येकाला देशभक्तीच्या सामूहिक प्रदर्शनात योगदान देऊ शकतो.
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी व्हा…
- आधी तुम्हाला ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहिमेत सहभागी व्हावे लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://harghartiranga.com/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- येथे तुम्हाला ‘पिन अ फ्लॅग’ पर्याय दिसेल आणि येथे दिलेल्या ‘अपलोड सेल्फी’ पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर भरा, तुमचा देश म्हणून भारत निवडा आणि नंतर तुमचा सेल्फी अपलोड करा.
- तुमचा सेल्फी अपलोड केल्यानंतर, तुम्हाला हवा असल्यास तो तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा.
- त्यानंतर तुम्हाला ‘जनरेट सर्टिफिकेट’ वर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही डाउनलोडवर क्लिक करून ते मिळवू शकता.