९ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती!
लातूर (Harvester Worship) : राज्यांतील सहकारी साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असलेल्या विलास नगर लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने (Farmers Cooperative Sugar Factory) घेतलेल्या स्वमालकीचे हार्वेस्टर, इन्फिडर व कारखान्याच्या वाहनांसाठी इंधन पुरवठ्यासाठी घेतलेल्या नूतन वाहनांचे पूजन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी तथा कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख (Factory Chairman Diliprao Deshmukh) यांच्या हस्ते गुरूवारी संपन्न झाले.
अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती!
यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन अशोकराव काळे संचालक तथा माजी व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, संचालक तथा अध्यक्ष ऊस विकास व ऊस पुरवठा कमिटी कैलास पाटील, तात्यासाहेब देशमुख, वसंत उपाडे, सदाशिव कदम, अनिल दरकसे, मदन भिसे, धनराज दाताळ, शंकर बोळंगे, निळकंठ बचाटे, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर पवार, बालाजी पांढरे, दयानंद बिडवे, भैरू कदम, तज्ञ संचालक सुरेश चव्हाण, श्रीकृष्ण काळे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष तानाजी जाधव, विलास चामले,अरुण कापरे, कार्यकारी संचालक पंडीत देसाई, सचिन दाताळ, बाळासाहेब कदम, हरिराम कुलकर्णी, खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
हार्वेस्टरद्वारे उसाची तोडणी होणार!
कारखान्याकडून चालु गळीत हंगाम २०२५-२६ यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली असून ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस वेळेवर गाळप व्हावा यासाठी पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी यंत्राचा वापर मांजरा कारखाना करत असून यासाठी स्वमालकीचे जवळपास २५ ऊस तोडणी यंत्र खरेदी केलेले आहेत. त्यामुळें आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करणार असल्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
चालू गाळप यशस्वी होईल!
राज्यात देशात नावलौकिक असलेल्या मांजरा साखर कारखान्याने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री आमदार अमित देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार धिरज भैया देशमुख यांच्या सहकार्याने यशस्वी वाटचाल सुरू ठेवली असून योग्य ऊस दर मिळत असल्याने आपला ऊस गाळपासाठी मांजरा साखर कारखान्याकडे देण्याचा कल शेतक-यांचा नेहमी राहीला आहे. यावर्षी ही राहील अशी अपेक्षा कारखाना प्रशासनाकडून यावेळी व्यक्त केली. गळीत हंगाम २०२५ -२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रती टन किमान ३१५० /- ऊस दर राहील असे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी मांजराच्या सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. त्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.