ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय!
हिंगोली (Health Check-up Camp) : ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि. 9 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार दि. 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात ज्येष्ठ नागरिक दिवस (Senior Citizens Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन!
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दि. 3 ऑक्टोबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले आहे.