परभणी उष्माघात संकट

परभणीत उष्माघाताचे संकट; मनपा आरोग्य विभाग अलर्ट

Parbhani heatstroke crisis: मार्च महिन्यात सूर्य आग ओकु लागला आहे. दिवसनदिवस तापमाना मध्ये वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णाघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी

परभणीत उष्माघाताचे संकट; मनपा आरोग्य विभाग अलर्ट

Parbhani heatstroke crisis

काळजी घेण्याचे मनपाचे आवाहन; सरासरीच्या तुलनेत ३ अंशाने अधिक वाढ

परभणी (Parbhani heatstroke crisis) : मार्च महिन्यात सूर्य आग ओकु लागला आहे. दिवसनदिवस तापमाना मध्ये वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णाघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

मार्च महिन्यातील सरासरीच्या तुलनेत तापमान ३ अंशाने अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णघाताचा धोका वाढला आहे. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर महिला, जाड व्यक्ती, पुरेशे झोप न झालेले व्यक्ती, मधुमेह, र्‍हदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, तसेच इतर अति जोखमीचे कामे करणारे व्यक्ती यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. किरकोळ त्रासामध्ये चक्कर येणे, ताप येणे, हातपायला गोळे येणे, अशी लक्षणे दिसतात. तर गंभीर स्वरूपाच्या उष्णतेचा त्रासात त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे,मानसिक बेचैनी व अस्वस्थतता, बेशुद्ध अवस्था अशी लक्षणे दिसतात. काही वेळेस मृत्यू ही होऊ शकतो.  उष्मघाताचे लक्षणे दिसणार्‍या व्यक्तीला वातानुकूलीत खोलीत ठेवावे, खोली हवीशीर असावी, खोलीत पंखे लावावेत, कुलर लावावेत, उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर तापमान कसे कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाचे कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.   

आरोग्य विभाग सज्ज
वाढणारा उन्हाचा तडाखा (Parbhani heatstroke crisis) लक्षात घेता आरोग्य विभाग परभणी शहर मनपा मार्फत शहरातील ४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केले आहेत. त्यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखला प्लॉट, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इनायत नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडोबा बाजार, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खानापुर. उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र संपर्क साधावा असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी....
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या, हलक्या फिकट रंगाचे सेलसर कपडे वापरा, उन्हात चष्मा, छत्री, टोपी व पादत्राने वापरावेत, पंखा, कुलर याच्या मदतीने घर थंड ठेवावे, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीमचा किंवा कोरफडीचा वापर करावा, असे आवाहन  तज्ञ डॉक्टरांनी केले आहे. 

उन्हात हे करणे टाळा 
कष्टाची कामे उन्हात करू नका, शक्यतो उन्हाच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळा, लहान मुलांना गाडीमध्ये ठेवू नका, मद्यपान,चहा, कॉफी शीतपेय टाळा, शिळे अन्न खाऊ नका, उन्हाच्या काळात भर दुपारी स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशीर ठेवा या प्रकारे खबरदारी घेतल्यास उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026