बाल आरोग्य तपासणी शिबिर

हिंगोली जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल आरोग्य तपासणी शिबिरात १० बालकांची मोफत 2D-इको तपासणी

Child Health Check-up: हिंगोली जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाळ स्वस्थ्य अभियानाच्या भाग म्हणून २० विद्यार्थ्यांसाठी हृदयशस्त्रक्रीया सांधले जातील. १० बालकांना मोफत 2D इको तपासणी

हिंगोली जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बाल आरोग्य तपासणी शिबिरात १० बालकांची मोफत 2D-इको तपासणी

Child Health Check-up


२० विद्यार्थी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित

हिंगोली (Child Health Check-up) : येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वतीने ० ते १८ वर्ष वयोगटातील हृदयरुग्णांसाठी विशेष 2D-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ९ सप्टेंबर  रोजी पार पडलेल्या या शिबिरात ठाणे येथील KIMS रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास एल. पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट, विजय खरात आणिउल्हास पाटील यांनी तपासणी केली.

या (Child Health Check-up) शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विजय गायकवाड आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या हस्ते झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील विभागप्रमुख डॉ. एल. एस. देशमुख यांनी विशेष भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चक्रधर मुंगल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. दत्ता दुधुळे, डॉ. स्नेहल नगरे आणि सौ. जोशी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव या तालुक्यांतील १० संशयित हृदयरुग्ण बालकांची या शिबिरात सखोल तपासणी करण्यात आली. त्यापैकी २० विद्यार्थ्यांना पुढील हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. संदर्भित विद्यार्थ्यांवर महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ठाणे येथील KIMS रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. शस्त्रक्रिया झालेल्या आणि योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी बोलताना डॉ. नितीन तडस यांनी जिल्ह्यातील सर्व पालकांना आवाहन केले की दैनंदिन जीवनात मुलांमध्ये हृदयाचे आजार आढळल्यास वेळोवेळी 2D-इको तपासणी करून घ्यावी आणि आजाराचे लवकर निदान करून उपचार करावेत.

या यशस्वी शिबिरासाठी जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक श्री. गाभणे लक्ष्मण, डीआयसी व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, अधिपरिचारिका श्रीमती शिंदे, परिचारिका श्रीमती कदम यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026