हिंगोली नर्सिंग वीक

हिंगोली येथे परिचारिका सप्ताहाचा उत्साहात समारोप

Hingoli Nursing Week: हिंगोलीतील वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात नर्सिंग सप्ताह यशस्वीरित्या साजरा करण्यात आला, ज्यात रुग्णांना फळांचे वाटप केले गेले.

हिंगोली येथे परिचारिका सप्ताहाचा उत्साहात समारोप

Hingoli Nursing Week

रुग्णांना फळवाटपाने सांगता

हिंगोली (Hingoli Nursing Week) : वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे दिनांक ५ मे ते १२ मे २०२६ या कालावधीत ‘परिचारिका सप्ताह’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणारा हा सप्ताह यंदा विशेष उपक्रमांनी गाजला. परिचारिकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करणे हा यामागील मुख्य उद्देश होता.

सप्ताहाच्या कालावधीत रुग्णालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, रस्सीखेच, लंगडी यांसारख्या पारंपरिक खेळांसोबतच बुद्धिबळ व कॅरम स्पर्धाही रंगल्या. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गायन, नृत्य, नाटिका व एकपात्री अभिनयाचे सादरीकरण परिचारिका भगिनींनी केले. रोज सकाळी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व सामूहिक प्रतिज्ञा घेऊन दिवसाची सुरुवात होत असे. ‘सेवेसाठी तत्पर’ या भावने सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

आज १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. (Hingoli Nursing Week) समारोप कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रुग्णालयातील सर्व आंतररुग्णांना फळांचे वाटप. डॉक्टर व परिचारिकांच्या हस्ते रुग्णांना सफरचंद, केळी व संत्री वाटण्यात आली. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. 

या (Hingoli Nursing Week) कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्यासह डॉ. गोपाल कदम, डॉ. सचिन बोदगिरे, डॉ. विशाल पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच मेट्रन बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक अधिसेविका रागिनी जोशी, सहाय्यक अधिसेविका आशा क्षीरसागर, सर्व परिसेविका, अधिपरिचारिका, ब्रदर्स व परिचर्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेट्रन चिंचकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक अधिसेविका जोशी यांनी मानले. अधिष्ठाता डॉ. मुंगल यांनी मार्गदर्शन करताना परिचारिकांना रुग्णसेवेचा कणा संबोधले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस यांनी परिचारिकांच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले. संपूर्ण सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व परिचर्या विभागाने विशेष मेहनत घेतली.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026