उदगीर पोलीस रक्तदान शिबिर

उदगीर पोलीसांच्या भव्य रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांचा उस्फूर्त सहभाग

Udgir Police Blood Donation: उदगीर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक रक्तदात्याला हेल्मेटची भेट.

उदगीर पोलीसांच्या भव्य रक्तदान शिबिरात २५३ रक्तदात्यांचा उस्फूर्त सहभाग

Udgir Police Blood Donation

 

हेल्मेट भेट देत रक्तदानासोबत रस्ता सुरक्षेचाही दिला संदेश

उदगीर () : समाजासाठी केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारी नव्हे, तर संकटात माणुसकीची ढाल बनणारी खाकी पुन्हा एकदा उदगीरकरांच्या मनात घर करून गेली. लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून उदगीर शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल २५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेष म्हणजे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गाढे यांनी स्वतः रक्तदान करून “प्रत्येक सक्षम नागरिकाने रक्तदानासाठी पुढे यावे” असे आवाहन केले. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने रक्तदान करत सामाजिक जबाबदारीचे भान जपले.

या (Udgir Police Blood Donation) शिबिरातील सर्वात आकर्षण ठरले ते म्हणजे प्रत्येक रक्तदात्याचा हेल्मेट देऊन करण्यात आलेला सन्मान! रोटरी क्लब लातूर यांच्या सहकार्याने रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. त्यामुळे “रक्तदानातून जीव वाचवा आणि हेल्मेटमुळे स्वतःचा जीव सुरक्षित ठेवा” असा दुहेरी संदेश समाजापर्यंत पोहोचला. या उपक्रमाला माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी भेट देत रक्तदात्यांचा सत्कार केला. तसेच भालचंद्र ब्लड बँक चे वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी तसेच शहर, ग्रामीण व उपविभागीय पोलीस कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. समाजासाठी रक्ताची नितांत गरज असताना उदगीर पोलीसांनी उभारलेले हे रक्तदान शिबिर म्हणजे केवळ उपक्रम नव्हे, तर माणुसकीचा जिवंत संदेश ठरला आहे.

“रक्ताच्या थेंबातून मानवता... हेल्मेटमधून सुरक्षिततेचा संदेश!”

“रक्तदान करून दुसऱ्याच्या शिरांत जीवनाचा प्रवाह सुरू करा आणि हेल्मेट घालून स्वतःच्या आयुष्याचे संरक्षण करा,” असा मानवता आणि सुरक्षिततेचा दुहेरी संदेश उदगीर पोलीस विभागाने आपल्या अभिनव उपक्रमातून दिला. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला नवजीवन देण्याचे पुण्यकार्य आहे, तर हेल्मेट हे स्वतःच्या जीवाचे संरक्षण करणारे कवच आहे. ‘दुसऱ्याचा जीव वाचवा आणि स्वतःचाही जीव जपा’ हा संदेश रक्ताच्या प्रत्येक थेंबातून आणि प्रत्येक हेल्मेटमधून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला. मानवतेची जाणीव आणि रस्ता सुरक्षेचे भान जागवणारा हा उपक्रम उदगीरकरांसाठी प्रेरणादायी ठरला.”रक्तदान करून दुसऱ्याच्या शिरांत जीवनाचा प्रवाह सुरू करा आणि हेल्मेट घालून स्वतःच्या आयुष्याचे संरक्षण करा; उदगीर पोलीसांच्या या उपक्रमाने समाजाला मानवतेसोबतच सुरक्षिततेचाही जिवंत संदेश दिला.”

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026