Chimur :- तालुक्यातील जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रम शाळेतील (Tribal Government Ashram School) विद्यार्थ्यांकडे आदिवासी विभाग, प्रकल्प कार्यालय, अधिक्षक व मुख्याध्यापक यांच्या हलगर्जीपणाने फाटलेल्या गाद्यावरच झोपावे लागत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना खाज, फोडे व दामोडे आलेले आहेत. नवीन गाद्या मिळाव्या म्हणून प्रकल्प कार्यालयास उन्हाळ्यापुर्वीच मुख्याध्यापकाने मागणी केली.
गाद्यांचा पुरवठा झाला नसल्याने विद्यार्थ्यांना फाटलेल्या गाद्यावर झोपावे लागत आहे
मात्र अजूनपर्यंत गाद्यांचा पुरवठा झाला नसल्याने विद्यार्थ्यांना फाटलेल्या गाद्यावर झोपावे लागत आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत चालविल्या जाणार्या जांभुळघाट येथील आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. आदिवासी विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्या विषयी हेळसांड होत असल्याने विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. शाळेतील दुषीत पाणी तथा शिळ्या अन्नामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले.
सध्या स्थितीत चिमूर वरून पाण्याच्या कॅन खरेदी केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्या विषयीच्या बातम्यांने पालक चिंताक्रांत झाले असून रक्षा बंधनाचे नाव सांगून आपल्या पाल्याला घरी नेत आहेत. अशाच प्रकारे एका पालक आपल्या पाल्यास नेण्यास आले असता गाद्या फाटल्याने त्यातील किडे , ढेकणे यामुळे फोडे व खाज झाली असून उपचाराकरीता नेत असल्याचे सांगितले