रुग्णवाहिनी वेळेवर न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू
पवनी (Pauni Hospital) : बुधवारी वॉर्ड येथील ६८ वर्षीय वृद्ध नागरिक सूर्यभान रामचंद्र शेंडे यांचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री अंदाजे ११ वाजता दरम्यान त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने (Pauni Hospital) पवनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले व पुढील उपचारासाठी तातळीने भंडारा जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे सांगितले.
मात्र, त्यांच्यासोबत एम्बुलन्सची तत्काळ सोय उपलब्ध नव्हती. १०८ हेल्पलाईनवर संपर्क साधून देखील पवनीतील एमर्जन्सी अॅम्बुलन्स अनुपलब्ध व नेहमीसारखी खराब असल्याचे सांगण्यात आले. परिणामी पालांदूर येथून अॅम्बुलन्स मागवावी लागली. दीड तासाच्या विलंबानंतर एमर्जन्सी अॅम्बुलन्स पोहोचली, पण तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला होता.
हा मृत्यू फक्त वैद्यकीय व्यवस्थेतील गोंधळ आणि (Pauni Hospital) रुग्णवाहिनीसारख्या मूलभूत सुविधेच्या अभावामुळे झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. शेवटचे संस्कार करण्याआधी शवविच्छेदनासाठी मृतदेह भंडारा येथे पाठवण्यात आला होता. यानंतर नातेवाईकांना मृतदेह परत देण्यात आला. मृतक सूर्यभान शेंडे यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुले, तीन मुली असा मोठा परिवार आहे. जनप्रतिनिधी आणि नागरिकांकडून वैद्यकीय यंत्रणेच्या गैरजबाबदारीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘एमर्जन्सीमध्येही रुग्णवाहिनी वेळेवर मिळत नसेल तर हे रुग्णालय (Pauni Hospital) आणि रुग्णवाहिनी कोणासाठी व कशासाठी? प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळतोय…’
-हर्षल वाघमारे, विदर्भ युवा क्रांती संघटना
ग्रामीण रूग्णालय पवनी येथे ३ रूग्णवाहिका असल्याचे कळले. त्यात १०८ नंबरची रूग्णवाहिका मागील ३ महिन्यापासून दुरूस्ती व सर्विसिंगला देण्यात आली. ती दुरूस्तही झाली परंतू ती का आणण्यात आली नाही? आर्थिक विवंचनेमुळे आणली नाही, असे कळले. परंतू सदर रूग्णांच्या मृत्यूनंतर झालेल्या हंगाम्यानंतर आजच ती रूग्णवाहिका आणायला कसे पाठविले. यामुळे ग्रामीण रूग्णालय पवनी (Pauni Hospital) येथील वैद्यकीय अधिक्षकांचे प्रशासन चालढक्कल पध्दतीने सुरू असल्याचे जाणवते. १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका अनेक महिन्यांपासून नादुरूस्त असल्याचे कळले.
एक तिसरी रूग्णवाहिका अनेकदा बाळंतपणासाठी रूग्णालयासमोर उभी असते. ती रूग्णवाहिका तिथे होती. परंतू त्याचवेळी एक बाळंतपणासाठी रूग्ण भर्ती होती. तिच्या गडबडीमुळे उभी असलेली रूग्णवाहिका सदर रूग्णाला नेण्यास असमर्थ असली तरी तिने नेण्याच्या प्रयत्नात असतांना पालांदूरवरून बोलविलेली १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका लवकरच (Pauni Hospital) पवनी ग्रामीण रूग्णालयात दाखल होत असल्यामुळे थांबले. परंतू सदर कालावधीत रूग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी काही काळ रोष व्यक्त केला असला तरी लवकरच वातावरण शांत झाले आहे. सदर प्रकारासंबंधी वैद्यकीय अधीक्षक डॉ. लांबट यांचेशी भेट घेतली असता सविस्तर काही कळले नाही.