प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक!
मानोरा (Heavy Rain) : आकांक्षीत वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे जुलै, ऑगस्टमध्ये प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी खोटे पंचनामे करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याच्या खाईत लोटले जात आहे. त्यामुळे शासनाकडून तुटपुंजी अतिवृष्टीची मदत मंजूर करण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मतदार संघातील विधानसभा व विधानसभा परिषदेचे लोकप्रतिनिधी यांना परत बोलवा व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक लाभ द्या, तसेच कर्जमुक्ती करा, असे निवेदन तहसीलदार मार्फत महामयम राज्यपाल यांना दि. 25 सप्टेंबर रोजी जनशक्ती प्रहारच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दिले आहे.
तहसीलदार मार्फत महामहीम राज्यपाल यांना निवेदन!
निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा तालुक्यात जुलै ऑगस्ट अतिवृष्टीसाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. शासनाकडून संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी १४५. ३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये मानोरा तालुक्यातील २० गावात ७६४ शेतकरी दाखवून ५४२. ४६ हेक्टर क्षेत्रसाठी केवळ ३८ लाख ४७६ रुपये तुटपुंजी मदत शासनाने जाहीर केली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचे पंचनामे प्रशासनाच्या (Administration) अधिकाऱ्यांनी कागदोपत्री खोटे करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कृषी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात यावे.
नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान!
तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी शेतकऱ्याच्या पिकांचेही प्रचंड नुकसान (Crops Damage) झाले असुन, नदी नाल्याला आलेल्या महापुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर (Farmers) सुलतानी व अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीच्या नुकसानीची सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे. असे निवेदन महामहीम राज्यपाल यांना प्रहारचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी पाठविले आहे. निवेदन देतेवेळी प्रहार चे माजी तालुका प्रमुख शाम पवार, प्रहारसेवक चेतन पवार, लहू आडे, अर्जुन राठोड, भीमराव राठोड, यश तुनगर, करण जाधव, महेश तूनगर, सागर जाधव, संदीप राठोड, ज्ञानेश राठोड, अंकुश राठोड, नितेश तूनगर , दीपक चव्हाण, सागर तूनगर, रितेश जाधव, राजेश पाटील व शेतकऱ्याची उपस्थिती होती.