उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे
हिंगोली (Hingoli Private Bus) : आगामी सणासुदीच्या काळात प्रवासी हे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बसधारकांकडून मनमानी भाडेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दीडपट पेक्षा अधिक आकारु नये, असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. तसेच याबाबत कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल, 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहे.
हिंगोली येथून मुंबईसाठी साधी (Hingoli Private Bus) बस (3×2) 1522 रुपये, निमआराम नॉन एसी 2067 रुपये, शिवशाही एसी सीटर 2424 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3840 रुपये आणि स्लीपर एसी 2530 याप्रमाणे आहे. हिंगोलीपासून पुणे येथे जाण्यासाठी साधी बस (3×2) 1160 रुपये, निमआराम नॉन एसी 1576 रुपये, शिवशाही एसी सीटर 1848 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2928 रुपये आणि स्लीपर एसी 1929 याप्रमाणे आहे. कोल्हापूर साठी साधी बस (3×2) 1417 रुपये, निमआराम नॉन एसी 1924 रुपये, शिवशाही एसी सीटर 2256 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3574 रुपये आणि स्लीपर एसी 2355 याप्रमाणे आहे. नागपूरसाठी साधी बस (3×2) 829 रुपये, निमआराम नॉन एसी 1126 रुपये, शिवशाही एसी सीटर 1320 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2091 रुपये आणि स्लीपर एसी 1378 याप्रमाणे आहे. इंदौर (वाशिम मार्गे) साधी बस (3×2) 1145 रुपये, निमआराम नॉन एसी 1556 रुपये, शिवशाही एसी सीटर 1824 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2890 रुपये आणि स्लीपर एसी 1904 याप्रमाणे आहे. सुरत (छत्रपती संभाजीनगर मार्गे) साधी बस (3×2) 1552 रुपये, निमआराम नॉन एसी 2108 रुपये, शिवशाही एसी सीटर 2472 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 3916 रुपये आणि स्लीपर एसी 2580 याप्रमाणे आहे.
छत्रपती संभाजीनगर साठी साधी (Hingoli Private Bus) बस (3×2) 558 रुपये, निमआराम नॉन एसी 757 रुपये, शिवशाही एसी सीटर 888 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 1407 रुपये आणि स्लीपर एसी 927 याप्रमाणे आहे. हैद्राबाद साठी साधी बस (3×2) 964 रुपये, निमआराम नॉन एसी 1310 रुपये, शिवशाही एसी सीटर 1536 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2433 रुपये आणि स्लीपर एसी 1603 याप्रमाणे आहे. सोलापूरसाठी साधी बस (3×2) 1055 रुपये, निमआराम नॉन एसी 1433 रुपये, शिवशाही एसी सीटर 1680 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 2661 रुपये आणि स्लीपर एसी 1754 याप्रमाणे आहे. अमरावती साठी साधी बस (3×2) 437 रुपये, निमआराम नॉन एसी 594 रुपये, शिवशाही एसी सीटर 696 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 1103 रुपये आणि स्लीपर एसी 726 याप्रमाणे आहे. अकोला साठी साधी बस (3×2) 316 रुपये, निमआराम नॉन एसी 430 रुपये, शिवशाही एसी सीटर 504 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 798 रुपये आणि स्लीपर एसी 526 याप्रमाणे आहे. वाशिम साठी साधी बस (3×2) 121 रुपये, निमआराम नॉन एसी 164 रुपये, शिवशाही एसी सीटर 192 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 304 रुपये आणि स्लीपर एसी 200 याप्रमाणे आहे. परभणी साठी साधी बस (3×2) 196 रुपये, निमआराम नॉन एसी 266 रुपये, शिवशाही एसी सीटर 312 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 494 रुपये आणि स्लीपर एसी 326 याप्रमाणे आहे. नांदेडसाठी साधी बस (3×2) 226 रुपये, निमआराम नॉन एसी 307 रुपये, शिवशाही एसी सीटर 360 रुपये, स्लीपर एसी व्हाल्वो 570 रुपये आणि स्लीपर एसी 376 याप्रमाणे आहे.
अधिकचे भाडे आकारल्यास प्रवाशांनी हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर किंवा 9657851836, 8087705550 या व्हॉटस्अप क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तसेच भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात, बसेसमध्ये, कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. शासन निर्णयानुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य परिवहन महामंडळाच्या समकक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दीड पट पेक्षा अधिक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.