कंपनीवर कारवाईची मागणी
हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या ने निवेदन
जवळा बाजार/हिंगोली (Hindu Samaj) : जेवणाच्या पत्रावळीवरील कव्हरवर श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण यांच्या फोटो संबंधित कंपनीने छापल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्या कंपनीवर पडत कारवाई करावी अशी मागणी हिंदू समाज बांधवांनी जवळा बाजार पोलीस चौकीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जवळा बाजारसह औंढा नागनाथ येथील किराणा दुकानावर जेवणाच्या पत्रावळी विकल्या जात असून या पत्रावळीवर श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आधी देवदेवतांचे फोटो छापण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या पत्रावळ्या जाळून टाकल्या जातात व इतरत्र फेकून दिल्या जात असल्याने (Hindu Samaj) हिंदू देवदेवतांच्या प्रतिमेची विटंबना होत असल्याने संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर संजय सोमानी,गोविंद जाधव, दत्तराव आभोरे, विश्वनाथ पवार आदी हिंदू समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.