हिंगोली(Hingoli):- ब्राह्मण सभा (Brahmin Sabha) सामुहिक उपनयन संस्कार सोहळा समितीच्यावतीने सोमवारी हिंगोली शहरात सामुहिक उपनयन सोहळा पार पडला. या निमित्त अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
बॅन्ड, ढोल-ताशाच्या गजरात रथामधून बटुंची भव्य मिरवणूक
हिंगोली शहरात ब्राह्मण सामुहिक उपनयन संस्कार सोहळा समितीच्या वतीने मागील वर्षापासून सामुहिक उपनयन संस्कार सोहळा घेतल्या जातो. त्या निमित्ताने यावर्षीही या सोहळ्याचे आयोजन हिंगोलीतील अकोला (Akola) रस्त्यावरील शिवलिला पॅलेसमध्ये २९ एप्रिलला सकाळी ११.२२ वाजता पार पडला. या निमित्ताने बॅन्ड, ढोल-ताशाच्या गजरात (sound of drums) रथामधून बटुंची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महिला, पुरूष, युवक या मिरवणुकीत सहभागी
यावेळी अनेक महिला, पुरूष, युवक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सोहळ्यात अराध्य दिपक पाठक (औंढा नागनाथ), अमोघ अजय भालेराव रा.हिंगोली, हर्षवर्धन विवेक करोडकर रा.हिंगोली, पार्थ तुषार आमले, सार्थक तुषार आमले, यश निलेश शर्मा या सहा बटुंचा उपनयन संस्कार सोहळा (Upanayan Sanskar Sohala)पार पडला.