कृषी उत्पन्न बाजार समिती
जवळाबाजा/हिंगोली (Agricultural Produce Bazar Samiti) : जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Bazar Samiti) अंतर्गत येणाऱ्या उपबाजार पेठ हट्टा व शिरड शहापूर येथील मार्केट यार्ड चा विकासाचा मार्ग रोखणाऱ्याला न्यायालयाने मनाई हुकूम फेटाळून चपराक लावली असल्याचे सभापती शिवाजीराव भालेराव (Shivaji Bhalerao) यांनी सांगितले. शिरड शहापूर उपबाजारपेठेसाठी 65 व्यापारी भूखंड व व हट्टा उप बाजारपेठेसाठी 124 व्यापारी भूखंड तसेच अंतर्गत शेतकरी निवास, अंतर्गत रोड, ऑफिस, कॅन्टीन, पाणीपुरवठा, नाली, बाजार ओटे तयार करून दोन्ही उपबाजार पेठेचा विकास व्हावा या हेतूने सभापती शिवाजीराव भालेराव व संचालक मंडळांनी ठराव पारित करून आर्किटेक्ट व इंजिनिअर यांच्याकडून संपूर्ण विकास आराखडा तयार करून पणन संचालक पुणे यांची मान्यता घेतल्यानंतर लिलाव करण्यात आला होता.
या भूखंड विक्रीला मनाई हुकुम बजावण्यासाठी माजी सभापती अंकुशराव आहेर यांनी वसमत न्यायालयात तर शिरड शहापूर येथील व्यापाऱ्यांनी औंढाणा न्यायालयात दावा दाखल करून स्थगिती मागितली होती. मात्र (Agricultural Bazar Samiti) न्यायालयाने मनाई हुकमाचा अर्ज फेटाळून लावला आहे. याविषयी सभापती शिवाजीराव भालेराव (Shivaji Bhalerao) यांनी माजी सभापती यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करताना माजी सभापती यांनी मागील 10 ते 12 वर्षात बाजार समितीचा कुठलाही विकास केला नाही व बोगस कर्मचारी भरून स्वतःच्या पुतण्याला ओबीसीच्या जागेवर तर काही कर्मचाऱ्यांना आरक्षण असताना खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देऊन स्वतःची तुंबडी भरली असा आरोप त्यांनी केला.