जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले मार्गदर्शन
हिंगोली (Hingoli Assembly Election) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरु आहे. (Hingoli Assembly Election) विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्ती मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण आज वसमत येथील सुरमणी दत्ता चौघुले नाट्यगृह आणि बहिर्जी स्मारक विद्यालयात घेण्यात आले.
प्रशिक्षणास गैरहजर सात कर्मचाऱ्यांना दिली नोटीस
आजच्या प्रशिक्षण सत्रात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षणास व सुविधा मतदान केंद्रास (Hingoli Assembly Election) जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मतदान केंद्राध्यक्ष-183, मतदान अधिकारी 183 व ईतर मतदार अधिकारी-366 पैकी 2 मतदान केंद्राध्यक्ष व 5 इतर मतदार अधिकारी असे एकूण 7 कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर होते. प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना नोटीस निर्गमित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.