हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदार संघातून भाजपाचे आ.तान्हाजी मुटकुळे तर कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे आ. संतोष बांगर यांनी विजय मिळविल्याने ७ डिसेंबर रोजी विधान भवनात त्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंगोलीतून आ.तान्हाजी मुटकुळे व कळमनुरीतून आ.संतोष बांगर यांनी विजय मिळविला आहे. ७ डिसेंबरपासुन ३ दिवशीय विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये आ.तान्हाजी मुटकुळे व आ.संतोष बांगर यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. आ.संतोष बांगर यांनी शपथ घेताना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, स्व. धर्मविर आनंद दिघे यांचे स्मरण करून शिवसेना पक्ष प्रमुुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपाशिर्वादाने आ.बांगर यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली तर आ.तान्हाजी मुटकुळे यांनी भारतीय संविधानाबद्दल श्रध्दा व निष्ठा बाळगून हाती घेण्यात येणारे कर्तव्य निष्ठा पुर्वक पार पाडण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.




 
			 
		

