हिंगोली (Hingoli Burglary) : शहराजवळील अकोला बायपास बळसोंड भागातील ओम नगरमध्ये एका व्यक्तीच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाट वाकवुन त्यातील दागिणे व नगदी रक्कम चोरून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
कळमनुरी तालुक्यातील भुरक्याची वाडी येथील माधव रामजी आमले हे बळसोेंड भागातील ओम नगरमध्ये वास्तव्यास असुन ते २२ मे रोजी घराला कुलूप लावुन पिंपळदरी येथे कामावर गेले होते. सकाळी ८ ते दुपारी ३ दरम्यान कोणी तरी (Hingoli Burglary) अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करून दोन लोखंडी कपाट कशाने तरी वाकवुन त्यातील १० हजाराच्या सोन्याच्या बाळ्या, १० हजाराची सोन्याची अंगठी, २० हजाराची काळ्या मन्याची सोन्याची पोथ व पेंडॉल आणि नगदी २० हजार रुपये असा एकुण ६० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बाळासाहेब खोडवे हे करीत आहेत.