शाळांच्या चारही बाजूने १०० मीटरच्या परिसरातील १० पान टपऱ्यावर धडक कार्यवाही!
हिंगोली (Hingoli City Illegal Shop) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (District Collector Rahul Gupta) यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता श्रीचक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे (Hingoli City Police Station) पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांच्या सहकार्याने जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलिस यांनी हिंगोली शहरातील शाळांच्या चारही बाजूने १०० मीटरच्या परिसरातील १० पान टपऱ्यावर ०८/१०/२०२५ रोजी धडक कार्यवाही (Strike Action) करण्यात आली.
ह्या कार्यवाहीत एकूण रु. २७००/- दंड वसूल करण्यात आला!
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ह्या आधीच शाळेच्या आवारातील पान टपऱ्यांवर (Pan Palace) कार्यवाही करण्याबाबत आदेश जारी केले होते, त्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात आली. जिल्हाभरात ही कार्यवाहीची मोहीम चालूच राहणार आहे. ही कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या नव नियुक्त अधिकारी जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्या सोबत श्री. आनंद साळवे (सोशल वर्कर), मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक श्री. मंगेश गायकवाड, शहर पोलिस ठाणे येथील श्री. शंकर ठोंबरे (नाईक पोलिस शिपाई), श्री. गणेश वाबळे आदींचे सहकार्य लाभले.
कोटपा कायदा- २००३ काय म्हणतो….
कलम – ४ :
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी.
कलम – ५ :
प्रत्यक्ष – तंबाखू युक्त कोणत्याही पदार्थाच्या अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी.
कलम – ६ अ :
१८ वर्षा खालील मुलांना तंबाखू युक्त पदार्थ विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे कायद्याने गुन्हा आहे.
कलम ६ ब :
शैक्षणिक संस्थांच्या चारही बाजूने १०० मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री करण्यास बंदी.
कलम ७,८,९ :
तंबाखूच्या पॅकेटच्या ८५ % भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे रेखांकित असावा.