कळमनुरी (Hingoli) :- शहरातील तांबोळी गल्ली भागातील एका ३० वर्षीय युवकाचा विवाह होत नसल्याने त्याने देवदरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केल्याची घटना घडली. याबाबत कळमनुरी पोलिसात सोमवारी आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
३० वर्षीय युवकाचा विवाह होत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या
घटनेबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी शहरातील तांबोळी गल्ली भागामधील गजानन बंडुअप्पा व्यवहारे (३०) हा तरूण आपल्या माता पित्यासह भावासोबत वास्तव्यास राहतो. गजाननचे शिक्षण १० वी पर्यंंत झाले असल्याने त्याने शेती करण्याचाच निर्णय घेतला होता. त्यामुळे तो मागील काही दिवसापासून शेतीमध्येच गुंतलेला होता. गजाननचा विवाह करण्याकरीता त्याच्या आई वडीलांनी काही ठिकाणी स्थळ पाहीली. परंतु विवाह योग जूळून आला नसल्याने यामध्ये व्यत्य येत होता. त्यातच आपला विवाह होत नसल्याने गजानन हा मागील काही दिवसापासून चिंतेत होता. लग्नासाठी मुलगी पहा असे आई वडीलांना वारंवार म्हणत होता. परंतु विवाह योग जुळून येत नसल्याने ही बाब लांबणीवर गेली होती. २४ फेब्रुवारी सोमवार रोजी नेहमीप्रमाणे तो आपल्या घरातून बाहेर पडला होता. देवदरी शिवारातील शेतामध्ये गेल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजू बाजूच्या शेतकर्यांना गजाननचा मृतदेह (dead body) झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी ही बाब त्याच्या घरातील व्यक्तींना सांगताच अनेकांनी शेताकडे धाव घेतली.
घटनेबाबत कळमनुरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मोहन भोसले, जमादार राठोड, गजानन होळकर, प्रशांत शिंदे, वैâलास सातव यांच्या पथकाने गजाननचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी कळमनुरी उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर (Autopsy) मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. घटनेबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात खंडु लिंगाआप्पा व्यवहारे यांनी दिलेल्या माहिती वरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास राठोड हे करीत आहेत.