हिंगोली (Hingoli crime branch) : शहरातील सम्राट अशोकनगर भागात तसेच कलगाव येथे पोलिसांनी मारलेल्या छाप्यात हातभट्टी दारूसाठा जप्त करण्यात आला. हिंगोली शहरातील सम्राट अशोकनगर भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून हातभट्टी दारूसह १ हजार लिटर सडके रसायन जप्त केले. ८ नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात २ हजाराची १५ लिटर गावठी दारू, ३५ हजार रूपयाचे हातभट्टी काढण्याचे मोहफुल, गुळ व इतर साहित्य असलेले रसायन १ हजार लिटर असा एकूण ३७ हजार रूपयाचा दारूसाठा जप्त केला. (Hingoli crime branch) हिंगोली शहर पोलिसात किशोर सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेखा कठाळू चव्हाण हिच्यावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास वडकुते करीत आहेत.
त्याचप्रमाणे हिंगोली तालुक्यातील कलगाव येथे ८ नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात ७ हजार रूपयाचे २०० लिटर मोहफुलाचे सडके रसायन, २ हजार रूपयाची २० लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण ९ हजार रूपयाचा अवैध दारूसाठा जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे पांडूरंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू मधुकर पवार रा.तोफखाना हिंगोली ह.मु.कलगाव याच्यावर (Hingoli crime branch) गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोणे, राजूसिंग ठाकुर, किशोर सावंत, विशाल खंडागळे, महादू शिंदे, प्रेमदास चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.