हिंगोली (Indian Cobra) : जवळा बु. शिवारातील शेतामध्ये नाग असल्याची माहिती सर्पमित्राला मिळताच, त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर (Indian Cobra) इंडीयन क्रोबासह १७ अंडी सुखरूप बाहेर काढले.
साप म्हटले की भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळत असते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी सर्पमित्र असल्याने कुठेही (Indian Cobra) साप निघताच त्यांना तात्काळ बोलविले जाते. अशाच पध्दतीने जवळा बु. येथील श्रीपाल चंद्रभान शिंदे यांच्या शेतातील बांधावर साप दिसून येताच सर्पमित्रांना बोलाविण्यात आले.
यावेळी नामवंत सर्पतज्ञ विजयराज पाटील, सर्पमित्र सिताराम तनपुरे, सय्यद रिहान, सय्यद फिरोज यांच्यासह सहकारी मित्र प्रदिप तनपुरे, नागेंदर वाकळे, परमेश्वर शिंदे, विलास शिंदे, श्रीपाद चंद्रभान शिंदे, सर्पमित्र बाळू ढोके, उत्तम पाटील, नागेश क्षिरसागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर बांधावर इंडीयन कोब्रा आढळून आला. त्याच ठिकाणी पाहणी केल्यानंतर (Indian Cobra) इंडीयन कोब्राचे १७ अंडे मिळून आले. सर्पमित्रांनी ही अंडी सुरक्षित बाहेर काढली. या १७ अंड्यातून पिल्लांना कृत्रिमरित्या बाहेर काढले जाणार असल्याची माहिती सर्पतज्ञ विजयराज पाटील यांनी दिली.




 
			 
		

