हिंगोली (Hingoli Dussehra Case) : शहरातील रामलीला मैदानावर श्री सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने औद्योगिक प्रदर्शनी भरविण्यात आली होती समितीच्या वतीने दिलेल्या नियम व अटीचे उल्लंघन केल्याने हिंगोली शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्राने दिलेली माहिती अशी की, (Hingoli Dussehra Case) हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर श्री. सार्वजनिक दसरा महोत्सव कालावधीमध्ये भरविण्यात आलेल्या औद्योगिक व कृषी प्रदर्शनेतील मनोरंजनाच्या साधनाचा लिलाव करण्यात आला होता. ज्यामध्ये झोके, पाळणे आदींचा समावेश होता. लिलावा प्रसंगी समितीच्या वतीने काही नियम व अटी लावण्यात आल्या होत्या. 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शनी मनोरंजनाची साधने उभारण्यासाठी मुदत देण्यात आली होती.
निविदेच्या अटीप्रमाणे ठरलेली पूर्ण रक्कम समितीकडे जमा करण्याची मुदत संपूनही ती संपूर्ण रक्कम मुदतीत जमा केली नाही तसेच निवेदेप्रमाणे दिलेल्या कालावधीत काम करण्याऐवजी कामाची मुदत संपल्यानंतर ही राम मैदानावर अवैध पद्धतीने झोके मनोरंजनाचे साधने ठेवून ताबा मिळविला हा ताबा बेकायदेशीर व अनधिकृत असतानाही शेख आजम शेख मुनाफ बेलदार राहणार शाही नगर (Hingoli Dussehra Case) हिंगोली याने रामलीला मैदानावरील मनोरंजनाची साधने न करता व्यवसाय करून अट शर्त भंग केल्याने मंडळ अधिकारी सय्यद अयुब सय्यद रसूल यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 12 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादी शेख आजम शेख मुनाफ बेलदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.