हिंगोली (Hingoli Dussehra Mahotsav) : येथील 170 वर्षाची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक (Hingoli Dussehra Mahotsav) दसरा मोहत्सवाची सुरुवात रविवारी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता जलेश्वर मंदिरात आकाशवाणी कार्यक्रमाने वाद्य. वाजवून, मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी दसरा महोत्सव (Hingoli Dussehra Mahotsav) समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्या हस्ते पूजा अर्चा, जलपूजन करून आरती करण्यात आली. यावेळी धोंडीराज पाठक यांनी मत्रौपचार करीत पूजन केले. त्यानंतर पंडित रामकुमार पांडे संचलित रामलीला मंडळीच्या कलावंतांनी मंदिराच्या प्रांगणात आकाशवाणी संदर्भात संगीत मय नाटिका सादर केली. दरम्यान या नाटिकेत पृथ्वीवरील मानव, मानव, ऋषी मुनी, देवी देवता, राक्षस, रावणाच्या अत्याचारामुळे भयभीत होऊन त्रस्त झाले होते. भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे संरक्षणा साठी याचना करतात. यावेळी विष्णू भगवान आकाशवाणीच्या माध्यमाने लवकरच मनुष्यरूपाने जन्म घेऊन रावण व राक्षसाचा वध करणार असल्याची घोषणा करतात.
यावेळी समितीचे अध्यक्ष समाधान घुटूकडे, मधुकर खंडागळे, गणेश साहू, पिंटू टाले, नायक भगवतीकर, धोंडीराज पाठक, पंडित रामकुमार पांडे, विस्वास नायक, राजेंद्र हलवाई, गणेश बांगर, नागेश धनमने, सुभाष पुरी महाराज, घडवई महाराज, दौलत बनसोडे, अनिकेत लव्हाळे, यश लव्हाळे, यासह भविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.