हिंगोली (Hingoli Gov Hospital) : वेतनत्रुटी, प्रशासकीय बदली यासह इतर मागण्या संदर्भात १५ जुलै रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात परिसेविका व अधिपरीचारीकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
परिसेविका व अधिपरीचारीकांचा अनेक मागण्या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करून सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने १५ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करून निदर्शने करण्याबाबत वरिष्ठस्तरावरून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार (Hingoli Gov Hospital) हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात निदर्शने करण्यात आली. तसेच परिसेविका व अधिपरीचारीकांनी काळ्या फिती लावून यामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता.
वेतनत्रुटी, सेवाप्रवेश नियम, प्रशासकीय बदली, कंत्राटीकरण रद्द करणे व शंभर टक्के पदनिर्मिती, शासना प्रमाणे भत्ता देण्यात यावा, शैक्षणिक वेतन वाढ व्हावी, पदनामामाध्ये बदल करण्यात यावा, अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. १६ जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन १७ जुलै रोजी राज्य व्यापी कामबंद आंदोलन व याची दखल न घेतल्यास १८ जुलै पासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या राज्याध्यक्षा मंदा बेंडे चौरे, कार्याध्यक्षा प्रियंका माळी, उपाध्यक्ष रवि जामनिक, संदिप धुळे, सुलोचना बुरुगे, सचिव राजु दरवडे, खंजीनदार हर्षद काळे, सहसचिव रागिनी जोशी, मनिषा लोखंडे, संघटक अंजली मठपती, उध्दव हिंगगिरे, पुजा काकडे, सदस्य एकनाथ बनसोडे, सविता पाईकराव, वैभव ढिलपे, सविता दिंडे, मंगल खाडे, सल्लागार आशा क्षिरसागर, कुलदिप कांबळे यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.