हिंगोली (Hingoli Municipal Corporation) : शहरातील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालया च्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-या व्यावसायिकावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई केली जात असताना आता हिंगोली नगर पालिकेच्या (Hingoli Municipal Corporation) पथकाने १५ जुलै मंगळवार रोजी शहरातील अनेक ठिकाणच्या पानटपर्यावर छापे मारून जप्तीची व दंडात्मक कारवाई केली.
शासन निर्णया नुसार शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचा १०० मीटर च्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे प्रतिबंधित आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या निर्देशान्वये मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तामध्ये हिंगोली शहरामध्ये शहरामध्ये पाहणी करून (Hingoli Municipal Corporation) हिंगोली शहरातील शैक्षणिक संस्था, शाळा,महाविद्यालये यांचा १०० मीटर च्या परिसरा मधील तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे एकुण ०८ पानपट्टी धारक यांच्या विरुद्ध दंडात्मक तथा जप्तीची कार्यवाही करण्यात आली या कार्यवाही दरम्यान एकुण दहा हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.
यावेळी शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांचा १०० मीटर च्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यात येऊ नये, तसे निदर्शनास आल्यास संबंधिता विरुद्ध जप्तीची कार्यवाही करून दंड वसूल करण्यात येईल असे सर्व व्यावसायिक, दुकानदार, पानपट्टी धारक यांना जाहीर आवाहन करण्यात आले. यावेळी मुखाधिकारी अरविंद मुंढे, पोलीस निरीक्षक संदीप मोदे, नगररचनाकार प्रविण मोहेकर, उपमुख्याधिकारी शाम माळवटकर, प्रकाश साबळे, नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, आकाश देशमुख, लेखापाल बोराटे, अनिकेत नाईक, स्थापत्य अभियंता, श्रीमती स्नेहल आवटे,विद्युत अभियंता भुरके, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, सचिन पवार, शाम कदम, गणेश कदम, गोविंद चव्हाण, संदीप घुगे, विजय रामेश्वरे, नितीन पहीनकर, कैलास थिटे, शिवाजी घुगे, राजेश डहाळे, दिनेश वर्मा, अफसर पठाण यांच्यासह सफाई विभागातील कर्मचारी उपस्थित होते.




