हिंगोली (Hingoli Panchayat Samiti) : येथील जुन्या जिल्हा न्यायालयाच्या बाजूला असलेल्या (Hingoli Panchayat Samiti) पंचायत समिती इमारतीमध्ये मागील ५० ते ६० वर्षापासून कामकाज केल्या जाते.परंतु आता सिध्दार्थ कॉलनीमध्ये असलेल्या नविन पंचायत समिती कार्यालयाची भव्य इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा २९ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्र्याच्या उपस्थितीत होणार असल्याने आ. तान्हाजी मुटकुळे यांनी २२ मे रोजी नविन इमारतीची पाहणी करत संबंधीत अधिकार्यांना त्रृटी असलेल्या सुचना दिल्या आहेत.
हिंगोली शहरातील नवीन पंचायत समिती (Hingoli Panchayat Samiti) कार्यालयाची भव्य इमारत उभारण्यात आली असून या इमारतीची पाहणी २२ मे रोजी आ. तानाजी मुटकुळे यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गायकवाड यांनी इमारती संदर्भात आ. तानाजी मुटकुळे यांना सविस्तर माहिती देवून पुढील काही दिवसातच नवीन इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान हिंगोली पंचायत समितीचे (Hingoli Panchayat Samiti) कार्यालय हे पुर्वीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाजूला असलेल्या जुन्या ५० ते ६० वर्षापुर्वीच्या इमारतीमध्ये सध्या कामकाज पं.स.चे चालू आहे. लोकार्पण सोहळा लवकरच होणार असल्याने विविध फाईल्स व फर्निचर नेण्याची लगबग जोरात सुरु आहे.