हिंगोली (CM Devendra Fadnavis) : येथील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले असून नुतन पं.स.च्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज २९ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
या (Hingoli Panchayat Samiti) प्रशासकीय इमारतीच्या सोहळ्याकरीता प्रमुख उपस्थिती माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोक चव्हाण, दुग्ध विकासमंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री नरहरी झिरवाळ, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हिंगोलीचे अध्यक्ष ना. हेंमत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता उर्जा आणि महिला बालविकास मंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर, खा.नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. प्रज्ञाताई सातव, हिंगोली मतदार संघाचे आ. तान्हाजीराव मुटकुळे, वसमतचे आ. चंद्रकांत उर्फ राजु नवघरे, कळमनुरीचे आ. संतोष बांगर, विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे.
जि.प.च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नुतन पं.स. इमारतीच्या सोहळ्रुास उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प.सीईओ अंजली रमेश, अतिरिक्त सीईओ अनुप शेगुलवार, कार्यकारी अभियंता शिवाजी पदमने यांनी केले आहे.




