हिंगोली (Hingoli police) : सेनगाव तालुक्यातील एका भाऊने टेबलवर नोटांची बंडले टाकून रिल्स् बनविल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच स्थानिक गुन्हे शाखेने भाऊ ला तात्काळ बुधवारी ताब्यात घेऊन भाऊंची दादागिरी अवघ्या दोन तासांत मोडून काढली.
मिळालेली माहिती अशी की, सेनगाव तालुक्यात (Hingoli police) रात्रीच्या वेळी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या वाळू उपसा केला जातो, अनेकवेळा महसूल व पोलिसांवरही हल्ले झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक रेतीमाफीये चारचाकी वाहनातून अवैध रेती वाहतुक करीत असतात यामधूनच ते मालामाल होत असतात. अशाच एका भाऊ ने टेबलवर नोटांची बंडले टाकून रिल्स् बनविली. सदरील रिल्स् समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. या संदर्भात काही नागरीकांनी (Hingoli police) पोलिस अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.
या प्रकारामुळे (Hingoli police) पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी सेनगाव पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक स्थापन करून १९ मार्चला भाऊ ला दुपारी ताब्यात घेऊन रिल्स् बाबत त्यांच्याकडे चौकशी करून अवघ्या दोन तासांत भाऊंची दादागिरी मोडून काढली. याबाबत भाऊने सदरील रिल्स् दोन वर्षापूर्वीची असून आपला वाळू वाहतुकीचा व्यवसाय नसल्याचे पोलिसांना सांगुन यापूढे बेकायदेशीर कोणतेही व्यवसाय करणार नाही अशी कबुली भाऊंनी दिली. यावेळी भाऊवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या सुत्रांकडून मिळाली आहे. भाऊची दादागिरी अवघ्या दोन तासात (Hingoli police) पोलिसांनी मोडून काढल्याने याबाबत मात्र चविष्ट चर्चा सुरू आहे.