हिंगोली (Hingoli Railway flyover) : शहरामध्ये यापूर्वी खटकाळी हनुमान परिसरात रेल्वे उड्डाणपुल उभारण्यात आला असल्यानंतर आता हिंगोली तहसील कार्यालया जवळी रस्त्यावर ४५ कोटी रुपये खर्चातून उभारल्या जाणार्या या (Hingoli Railway flyover) रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ गुरूवारी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या हस्ते करण्यात आला.
४५ कोटी रुपयाच्या निधीतून उभारला जाणार नवीन रेल्वे उड्डाणपुल
हिंगोली विधानसभा मतदार संघात रस्त्यासह उड्डाण पुलाकरीता आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची अनेकवेळा भेट घेतल्यानंतर या विकासाच्या कामांना ना. गडकरींनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यापूर्वी खटकाळी हनुमान परिसरातील (Hingoli Railway flyover) रेल्वे उड्डाण पुलाला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून रेल्वे उड्डाणपुल उभारून वाहन चालकांना ये जा करण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे.
हिंगोली शहरातील अकोला बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चौपदरी रस्त्याच्या कामाला सुरूवात झालेली आहे. या रस्त्याच्या कामामध्ये तहसील कार्यालयाजवळ नविन (Hingoli Railway flyover) रेल्वे उड्डाणपुल उभारणीकरीता ४५ कोटी रूपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निधीतून नविन रेल्वे उड्डाणपुल उभारला जाणार आहे.
आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते नविन रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभ
६ मार्च रोजी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या हस्ते (Hingoli Railway flyover) रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महारेलचे अधिकारी राकेशकुमार शर्मा, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गोवर्धनअण्णा विरवुँâवर, अॅड. के.के. शिंदे, हमीद प्यारेवाले, गणेश साहू, उत्तमराव जगताप, उमेश नागरे, मनोज शर्मा, शाम खंडेलवाल, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, माजी नगरसेवक उमेश गुठ्ठे, सदाशिव सुर्यतळ, अॅड. राजेश गोटे, बाबा घुगे, आशिष जयस्वाल, शंकर जोजार, राजू यादव, अग्रवाल, नारायण खेडकर, नंदकुमार सवनेकर आदींची उपस्थिती होती.
३० मीटरच्या जागेमध्ये हा रेल्वे उड्डाणपुल उभारला जाणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्यात साडेसात मीटरचा (Hingoli Railway flyover) रेल्वे उड्डाणपुल उभारला जाणार आहे. त्यानंतरच पुरातनकालीन व निजामकालीन रेल्वे पुल पाडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्या साडेसात मीटरच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी दिली.