हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : हिंगोली ते पुणे शिवशाही स्लिपर नॉनस्टाप विनाथांबा बस सुरू करावी या मागणीसाठी आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरतसेठ गोगावले यांच्याकडे निवेदनाद्वारे शिफारस केली असता गोगावले यांनी व्यवस्थापकीय संचालकांना या मागणीबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
जिल्हास्तरीय शहर असलेल्या हिंगोलीतुन पुणे येथे प्रत्येक दिवशी अनेक प्रवाशांची मोठी ये-जा असते. पुणे येथे जाण्याकरीता हिंगोलीतुन केवळ दोन साप्ताहिक रेल्वे आहेत. त्यामुळे बहुतांशी प्रवाशी बसेसनेस पुणे येथे ये-जा करीत असतात. हिंगोली ते पुणे शिवशाही स्लिपर विनाथांबा बस सुरू करावी अशी प्रवाशी वर्गाची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने काही प्रवाशांनी (MLA Tanhaji Mutkule) आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या निदर्शनास ही बाब आणुन दिली.
त्यामुळे आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांंनी २० डिसेंबरला महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरतसेठ गोगावले यांना पत्राद्वारे शिवशाही स्लिपर नॉनस्टाप विनाथांबा बस सुरू करावी अशी मागणी केली. काही खाजगी कंपण्याच्या वाहनाचे मालक प्रवाशांची लुट करीत असल्याने हिंगोली ते पुणे स्लिपर विनाथांबा ही बस तात्काळ सुरू करावी अशी मागणी (MLA Tanhaji Mutkule) आ. मुटकुळेंनी केली होती. त्यानुसार महामंडळाचे अध्यक्ष भरतसेठ गोगावले यांनी व्यवस्थापकीय संचालकांस याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.