हिंगोली (Hingoli Tragic death) : शहरातील एनटीसी भागामध्ये १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ११ के.व्ही. विजेच्या लाईनवर काम करीत असलेल्या एका कंत्राटी मजूरदाराचा विजेच्या तीव्र झटक्याने (Hingoli Tragic death) मृत्यू झाला.
आदिवासी मुलींच्या वसतिगृहाजवळ नवीन जनित्र बसविण्याकरीता मंगळवारी एनटीसी भागामध्ये वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. सदरील काम अमरावती येथील महारूद्र कंन्सल्टींग लि. यांना देण्यात आले होते. सदरील कंत्राटदाराचे मजूरदार काम करीत असताना त्यातील रितीक गोपाल टेकाम (२५) रा. महेंद्री ता. वरूड जि. अमरावती हा विजेच्या खांबावर गेला असता अचानक त्याला विजेचा तीव्र झटका बसल्याने तो त्याच ठिकाणी चिटकुन त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच (Hingoli Tragic death) महावितरणचे उप कार्यकारी अभियंता रंजित देशमुख, सहाय्यक अभियंता वैâलास फड, कनिष्ठ अभियंता सचिन बेरसले, प्रदिप इंगळे, संतोष गिते तसेच हिंगोली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप मोदे, सपोनि संगम परगेवार, संजय मार्के, शेख अमजद, शेख मुजीब, अजहर पठाण यांच्या पथकाने धाव घेऊन मृतदेह वीजेच्या खांबावरून अग्निशमन दलाच्या पथकाची मदत घेऊन खाली उतरविला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.