हिंगोली (Hingoli Water supply) : शहरामध्ये उन्हाळ्यापासून ते आतापर्यंत या ना त्या कारणावरून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना नगरसेवक गणेश बांगर यांनी गरजु असलेल्या भागामध्ये स्वखर्चातून मोफत (Hingoli Water supply) पाणी पुरवठा करून नागरीकांना दिलासा दिला आहे.
हिंगोलीत सध्या स्थितीत मागील काही दिवसापासून शहरवासीयांना निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. धनदांडगे नागरीक टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून घेत आहेत. परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे असे नागरीक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यामुळे आ. संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत शिवसेना नगरसेवक गणेश बांगर यांनी स्वखर्चातून काही भागामध्ये गरजु नागरीकांना टँकरद्वारे मोफत (Hingoli Water supply) पाणी पुरवठा केला आहे. गरजेच्या वेळी नगरसेवक गणेश बांगर यांनी नागरीकांना दिलासा दिल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे.