अनेक मतदार संघ पुन्हा आरक्षित राहील्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले
उच्च् न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली झाल्या सुरू
उच्च् न्यायालयात दाद मागण्याच्या हालचाली झाल्या सुरू
हिंगोली (Hingoli Zilha Reservation) : मिनी मंत्रालयाचे आरक्षण जाहीर करताना नवीन चक्रानुक्रम लागू केल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. जिल्हाभरातून अनेक इच्छुक या नवीन आरक्षण पध्दती विरोधात न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
आरक्षण जाहीर (Hingoli Zilha Reservation) होण्याच्या क्षणापर्यंत चक्रानुक्रम कोणते लावले जाणार आहे, या बाबत मोठा संभ्रम होता. काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आल्याने जुन्या चक्रानुक्रमानुसार आरक्षण लागू होईल अशी आशा अनेकांना होती. शेवटी नवीन चक्रानमुक्रम लावल्याने अनेक ठिकाणी पूर्वीचे आरक्षित असलेले मतदार संघ खुले होण्या ऐवजी पुन्हा आरक्षित झाले आहेत. यामुळे नाराज असलेल्या भावी जिल्हा परिषद सदस्यांनी आरक्षणाच्या प्रमाणित याद्या हस्तगत करून उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
१३ ऑक्टोंबर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली (Hingoli Zilha Reservation) जिल्हा परिषद, हिंगोलीच्या गटनिहाय आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृह येथे काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) अनिल माचेवाड उपस्थित होते.
जाहीर झालेले आरक्षण पुढील प्रमाणे:
हिंगोली तालुका – फाळेगाव ओबीसी, आडगाव अनुसूचित जाती, खेर्डा ओबीसी, पेडगाव सर्वसाधारण, बासंबा सर्वसाधारण, बळसोंड ओबीसी, भांडेगाव सर्वसाधारण महिला, नर्सी ना. सर्वसाधारण महिला, डिग्रस क. सर्वसाधारण, कोथळज सर्वसाधारण महिला.
कळमनुरी तालुका – खरवड अनुसूचित जमाती महिला, वाकोडी अनुसूचित जमाती महिला, येहळेगाव तु. ओबीसी महिला, नांदापूर सर्वसाधारण महिला, सिंदगी ओबीसी, पोत्रा अनुसूचित जमाती महिला, आ.बाळापूर अनुसूचित जाती महिला, शेवाळा अनुसूचित जाती महिला, वारंगा फाटा सर्वसाधारण महिला, जवळा पांचाळ सर्वसाधारण, डोंगरकडा सर्वसाधारण महिला.
सेनगाव तालुका – सवना सर्वसाधारण महिला, गोरेगाव अनुसूचित जाती, बाभुळगाव अनुसूचित जाती, आजेगाव अनुसूचित जाती महिला, पानकनेरगाव सर्वसाधारण महिला, वरूड चक्रपाण सर्वसाधारण, साखरा ओबीसी महिला, हत्ता अनुसूचित जाती, भानखेडा ओबीसी महिला, पुसेगाव सर्वसाधारण.
औंढा नागनाथ तालुका – येहळेगाव सोळंके सर्वसाधारण, पिंपळदरी त.नांदापूर अनुसूचित जमाती, जलालदाभा असुसूचित जमाती, सिध्देश्वर अनुसूचित जमाती, माथा सर्वसाधारण महिला, उखळी ओबीसी, जवळा बाजार ओबीसी, पुरजळ ओबीसी महिला, शिरडशहापूर सर्वसाधारण.
वसमत तालुका – पांगरा शिंदे सर्वसाधारण महिला, कुरूंदा ओबीसी महिला, कवठा सर्वसाधारण, आंबा सर्वसाधारण, टेंभूर्णी ओबीसी, करंजाळा सर्वसाधारण महिला, हट्टा ओबीसी, खांडेगाव सर्वसाधारण महिला, हयातनगर अनुसूचित जाती महिला, गिरगाव ओबीसी महिला, बाभुळगाव सर्वसाधारण, आसेगाव सर्वसाधारण अशी आरक्षण प्रक्रीया सोडत जाहीर करण्यात आली.
आरक्षण सोडत प्रसंगी अनेक राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते. जशी जशी (Hingoli Zilha Reservation) आरक्षण प्रक्रीया टप्याटप्याने पुढे जात असताना त्यातील काही जणांचे गट आरक्षित झाल्याने त्यांनी सभागृहातून पाय काढता घेतला. या सोडत प्रक्रीये प्रसंगी नायब तहसीलदार जोशी यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील एकुण ५२ जिल्हा परिषद गटांपैकी २६ महिलांसाठी आरक्षित आहेत.जात निहाय आरक्षणानुसार अनुसूचित जाती ८, अनुसूचित जमाती ६, ओबीस १४, सर्वसाधारण २४ असे ५२ गट आहेत. यापैकी प्रत्येक प्रवर्गातील महिलांसाठी निम्मे व पुरूषांसाठी निम्मे गट आरक्षित आहेत. पूर्वीचे सुरू असलेले चक्रानुक्रम न वापरल्याने अनेक ठिकाणी पूर्वी आरक्षित असलेले गट पुन्हा आरक्षित झाले आहेत. या विरोधात दाद मागण्यासाठी जिल्हाभरातून अनेक इच्छुक न्यायालयात जाणार असल्याचे समजते.
अनेकांचे भंगले स्वप्न
जिल्ह्यातील एकमेव कळमनुरी तालुक्यात ११ पैकी ९ जिल्हा परिषदेचे गट आरक्षित झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या गटातून इच्छुक असलेले जि. प.चे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, माजी सभापती संजय देशमुख, बाळासाहेब मगर, शामराव जगताप, संजय दराडे, गोपू पाटील सावंत, माजी सरपंच अभय सावंत यांचे गट आरक्षित झाले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुकांचे मिनी मंत्रालयात जाण्याचे स्वप्न भंगले आहेत.