हिंगोली (Hingoli) : जिल्हा रुग्णालयात दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी गुडघ्याच्या मधील फाटलेल्या गादीसाठी करण्यात आलेली, जिल्ह्यातील पहिली दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (Telescopic Surgery) यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक (Surgeon) डॉ. नितीन तडस व डॉ. गोपाल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली. अस्थिरोगतज्ञ (Astrophysicist) डॉ. मंगेश टेहरे व डॉ. मनीष बगडिया यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
पाय लचकून पडल्यामुळे 22 वर्ष गारमाळ येथील आयान नथू गरीब या तरुणाच्या गुडघ्याच्या मधील गादी फाटल्याचे निदान एमआरआय स्कॅन वर झाले होते. त्यासाठी लागणारी बिन टाक्याची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात (District Hospital) प्रथमच यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. यासाठी नांदेडचे सुप्रसिद्ध डॉ. मुकेश मालू, जे की दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे त्यांचा सहकार्य लाभला. सिस्टर बेडे, कंधारे, व क्षीरसागर यांनी व सहाय्यक राजेश काळे व संजू सुतारे यांचे विशेष योगदान राहिले.




