कळमनुरी (Hingoli) :- काश्मीर च्या पहलगाम येथे निष्पाप भारतीय पर्यटका ची गोळ्या घालून हत्या (Death) केली. घटनेत मृत्यू पडलेल्या भारतीयांना कळमनुरी शहरवासियांनी श्रद्धांजली देत या भ्याड हलल्याचा निषेध केला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये भारतीय पर्यटकावर हल्ला करीत दहशतवाद्यांनी 28 निष्पाप भारतीयांना ठार केले. ही घटना अत्यंत घृणास्पद चीड आणणारी असून घटनेचा तीव्र निषेध कळमनुरी येथे नागरिकांनी केला.
केंद्र शासनाकडे पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी
महाराणा प्रताप चौक येथे श्रद्धांजली (Tribute) कार्यक्रमात विनम्र श्रद्धांजली देण्यात आली. तसेच घटनेचा तीव्र निषेध करीत या आतंकवादयांना पकडून शिक्षा द्यावी व यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला ही धडा शिकवावा अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली. या वेळी माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, शिवा शिंदे, राहुल मेने, उमर फारूक शेख, अण्णा मेने, नंदकिशोर मणियार, अरविंद पाटील, ऍड मनोज देशमुख, ऍड गुणांनंद पतंगे, विनोद बांगर, ओमकार नावडे,योगेश संगेकर आमिष दरक, बाळासाहेब घुसे, गोविंद मनियार,संतोष पाटील,आदी सह मोठया संख्येने नागरिक व्यापारी वर्ग उपस्थित होते.



 
			 
		

