परभणी शहरातील नटराज रंग मंदिर परिसरातील घटना परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हे दाखल…!
परभणी (Parbhani Youth Murder) : शहरातील नटराज रंग मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत दारु पित असलेल्या गटात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. गौस खान अकबर खान रा. सेवक नगर या २३ वर्षीय तरुणाच्या डोक्यात काचेची बॉटल मारून खून करण्यात आला. या प्रकरणी स. खाजा स अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ३ जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच (Parbhani Youth Murder) प्रकरणात गंगाधर नारायण पाचंगे यांनीही तक्रार दिली. त्यावरुन नानलपेठ पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार १५ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास नटराज रंग मंदिरच्या मागच्या मोकळ्या जागेत फिर्यादी स.खाजा स. अहमद याचा मेहूणा गौस खान अकबर खान याचे प्रफुल्ल कचरु खिल्लारे, गणेश नारायण पाचंगे, प्रमोद सोपान घाडगे यांच्यासोबत अज्ञात कारणावरुन वाद झाला. यावेळी आरोपींनी गौस खान अकबर खान यास विटा, काचेची बॉटल डोक्यात मारुन खून करण्यात आला.
अशा आशयाची तक्रार दिली. त्यावरुन आरोपी प्रफुल्ल खिल्लारे, गणेश पाचंगे, प्रमोद घाडगे यांच्या विरुध्द (Parbhani Youth Murder) नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच प्रकरणात परस्पर विरोधी तक्रार गंगाधर नारायण पाचंगे यांनी दिली आहे. यात नमुद करण्यात आले की, फिर्यादी गणेश पाचंगे व प्रमोद घाडगे, प्रफुल्ल खिल्लारे हे दारु पित बसले होते. तेव्हा आरोपी गौस खान अबकर खान हा तेथे आला. त्याने कोणत्या तरी कारणावरुन प्रमोद घाडगे याच्या डोक्यात बीयरची बॉटली मारली. त्यामुळे प्रमोद घाडगे खाली पडला.
नंतर गौस खान अकबर खान याने फिर्यादी गंगाधर पाचंगे व मित्रावर हल्ला केला. झटापटीत पाचंगे व प्रफुल्ल खिल्लारे जखमी केले. तेव्हा गंगाधर पाचंगे व त्याच्या मित्रांनी आरोपी गौस खान यास मारहाण केली. त्यामुळे तो खाली पडला असल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरुन मयत गौस खान अकबर खान याच्या विरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास नानलपेठ पोलिस ठाण्याचे सपोनि. कारवार हे करीत आहेत.
दरम्यान घटनास्थळास पोलीस अधिक्षक रिंवंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपककुमार वाघमारे, सपोनि. कारवार, सपोनि. खजे, सपोनि. सुरवाडे, सपोनि. सय्यद, पोउपनि. नारमोड, बुधोडकर, कदम आदींनी भेट दिली.




