परभणी (Parbhani):- विशालगढ अतिक्रमण मुक्त असा इशारा देत दर्गा, मस्जीद आणि मुस्लीम घरांवर हल्ले करणार्या जातीयवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हजरत टिपु सुलतान युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देण्यात आले आहे.
हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्गाचा इतिहास चारशे ते पाचशे वर्ष जुना
विशालगडावर (Vishalgadh)असलेली सुफी संत हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्गाचा इतिहास (History)चारशे ते पाचशे वर्ष जुना आहे. जातीयवादी संघटनांकडून दर्गाला लक्ष्य केल्या जात आहे. स्थानिक मुस्लीमांच्या घरावर दगडफेक करत नासधुस करण्यात आली. आतंक माजविणार्यांवर कारवाई(action) करत त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अॅड. आसेफ पटेल, मोहम्मद गौस झैन, मौलाना रफियोद्दिन आश्रफी, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, मौलाना अब्दुल रहेमान कादरी, सय्यद अब्दुल कादर, नदीम इनामदार, अहेमद खान, शेख माजीद, बदर चाउस आदींच्या स्वाक्षर्या आहेत.