सीईओ वैभव वाघमारे यांच्या निर्देशाचे पालन!
रिसोड (Honoring Womens) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रिसोड तालुक्यातील मोठेगाव ग्राम पंचायतने (Mothegaon Gram Panchayat) जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांच्या निर्देशाचे पालन करत समाजातील कर्तबगार, कार्यतत्पर महिलांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख 500 रुपये देऊन 31 मे रोजी सन्मानित केले. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात सामाजिक आणि विकासात्मक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदविणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (Ahilyadevi Holkar Birth Anniversary), 31 मे रोजी सन्मानित करण्याची योजना 2023 पासून अंमलात आली; परंतु यंदा 29 मे पर्यंत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने प्रस्ताव मागविण्याची हालचाल केली नव्हती. परिणामी, निकषात बसणाऱ्या महिला या सन्मानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली.
समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे फर्मान!
ही बाब लक्षात येताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer of Zilla Parishad) वाघमारे यांनी तडकाफडकी पत्र काढून रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे फर्मान सोडले. गट विकास अधिकारी किशोर लहाने यांनी तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत (Gram Panchayat) दिल्या मोठेगाव ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत मधील कर्तबगार महिला म्हणून मीनाक्षी रमेशराव देशमुख प्रतिभा सदाशिव पाठक नंदाबाई रूपराव तायडे पद्माबाई प्रल्हादराव देशमुख सीमा केशव फुके अयोध्या देवानंद देशमुख वोमिका रमेश धांडे याचा सत्कार केला. याप्रसंगी रमेश धांडे गणेश पुंजाजीराव देशमुख ग्राम पंचायत सचिव आर पी खराडे, रामप्रसाद बसेराव देशमुख भगवान रायभान सूर्यवंशी यांच्यासह गावातील महिला ग्रामपंचायत कर्मचारी (Women Gram Panchayat Employees) वर्ग यांची उपस्थिती होती. त्याची अपेक्षित फलश्रृती होऊन कर्तबगार महिलांना ग्रामपंचायतींकडून सन्मानित होण्याची संधी मिळाली. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.