परभणीतील पाथरी येथील माळीवाडा येथे भरदिवसा घटना!
परभणी (House Burglary) : परभणीच्या पाथरी येथील माळीवाडा भागात 12 जून रोजी दुपारी एक ते पावणे तीन या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. सदर प्रकरणात 13 जुनच्या रात्री गुन्हा नोंद झाला असून चोरट्यांनी एकूण 5 लाख 93 हजाराचा मुद्देमाल लंपास केला असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
अज्ञातावर गुन्हा दाखल!
साहेब मानोलीकर यांनी तक्रार दिली आहे. 12 जुनला दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी हे सासुचे निधन झाल्याने परिवारासह सासुच्या घराकडे गेले होते. दुपारी पावणे तीनच्या सुमारास घरी परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जावून पाहणी केल्यावर सोन्याचे गंठण, लॉकेट, अंगठी, झुंबर, पोत, नेकलेस, चांदीचे दागिने व रोख 1 लाख रुपये, असा एकूण 5 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. श्वान पथक, ठसे पथकालाही (Imprint Squad) पाचारण करण्यात आले. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर (Thief) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
घरासमोरुन चारचाकी लंपास!
पाथरी : शहरातील शिक्षक कॉलनी भागात घरासमोर उभी केलेली एकाची चारचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. पंकज नखाते यांच्या ताब्यातील एम.एच. 22 यु. 3400 या क्रमांकाची गाडी चोरीला गेली आहे. या प्रकरणी 13 जुनला पाथरी पोलिसात (Pathari Police) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.