यवतमाळ (Yawatmal):- मध्यंतरी बंद झालेला गृहपयोगी वस्तु संच वाटपाचा टप्पा सुरू झाला असून उद्यापासून घाटंजी आर्णी आणि केळापूर या तीन तालुक्यांत वाटप होणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई (Mumbai)मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील नोंदणी जीवित पात्र बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वाटप करण्यास जिल्ह्यांमध्ये संबंधित कंपनीकडून जिल्हा व तालुका स्तरावर नगर परिषद (City council) सभागृह तसेच तालुका क्रीडा संकुल येथील ठिकाणी वाटप करण्यासाठी कामगार विभागाने नियोजन केलेआहे
रविवार दि. १८ ऑगस्टला घाटंजी येथील तहसील कार्यालय, १९ ऑगस्टला केळापूर येथे बचत भवन हॉल नगर परिषद केळापूर तर २० ऑगस्टला आर्णी येथील तालुका क्रीडा संकुल येथे आ. संदीप धूर्वे यांच्या उपस्थितीत गृहपयोगि (home use)वस्तू संचाचे वाटप करण्यात येणार आहे.
मंडळामध्ये जिवित नोंदीत पात्र बांधकाम कामगारांचे नोंदीत दिनांकनुसार यादी तयार करण्यात आली आहे. ज्या कामगारांना मे. मफतलाल इंडस्ट्रीज मुंबई यांच्याद्वारे संपर्क साधण्यात येईल त्याच कामगारांना गृहोपयोगी वस्तु संच मिळणार असल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे.