अकोला (Houses Fire) : जुने शहरातील शिवसेना वसाहत, चौक परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे दोन ते तीन घरांची राखरांगोळी झाली. या आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सदर आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन बंबांच्या साहाय्याने (Houses Fire) आगीवर नियंत्रण मिळविले. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.
आगीचे कारण अस्पष्ट, नागरिकांची तारांबळ
जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील शिवसेना चौक व वसाहत परिसरातील रहिवासी असलेले दुर्गा तायडे व विशाल इंगळे यांच्यासह इतर घरांना अचानक भीषण आग लागली. त्यामध्ये दोन ते तीन घरे जळून खाक झाली. घरातील दैनंदिन वापराचे साहित्य व इतर अत्यावश्यक वस्तू, अन्न-धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर साहित्य पूर्णपणे जळाले आहे.
अग्निशमन विभागाने आगीवर मिळविले नियंत्रण
तसेच काही हातमजुरी करून रोख रक्कमसुध्दा घरात होती. तीदेखील जळाली आहे. या (Houses Fire) आगीची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने नगरसेवक अमोल गोगे यांना दिल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देऊन अग्निशमन विभागातील बंबांना पाचारण केले आणि काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले.
शासनाने मदत देण्याची मागणी
जुने शहरातील शिवसेना वसाहत, चौक परिसरातील दोन ते तीन घरांची अचानक लागलेल्या (Houses Fire) आगीमुळे राखरांगोळी झाली. त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांसह नगरसेवक अमोल गोगे यांनी केली आहे.