दखल देशोन्नतीची, अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Hunger strike) : अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच गावाच्या धरणामध्ये खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे यांनी सहा दिवसा पासून धरणामध्ये आमरण उपोषण सुरु केले होते. या घटनेची बातमी दै देशोन्नती मध्ये प्रकाशीत होताच तात्काळ अखेर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणेदार विकास पाटील यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.
गुंजाळा, अंढेरा, शिवणी आरमाळ या तीन गावाच्या शेतकऱ्यांची शेत जमीन सिंचनाखाली यावी मुद्द्यावर कैलास नागरे अधिकच आक्रमक झाले असून आता मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यांच्यासाठी शिवणी आरामाळ परिसरातील समर्थकांनी रात्रभर जागून त्यांना साथ दिली. प्रकृती खालावत असल्याने स्थानिक पत्रकारांनी उपोषण मंडपाला भेटी दिल्या आणि विनंती केली की थंडीचे दिवस आहेत प्रकृती सांभाळा जीवाचे बरेवाईट होवू शकते. त्याचं बरोबर महिला या (Hunger strike) उपोषणस्थळी दाखल झाल्या आहेत. सर्वांनीच त्यांना पाणी व उपचार घेण्याची विनवणी केली होती. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे उपस्थित पत्रकार व महिला वर्ग भावूक झाले आहेत .
हा प्रकार पाहुण परिसरातील जनतेचा ओघ वाढत चालला असून नागरे यांच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली जात आहे.एकीकडे थंडीचे दिवस असून. या कडाक्याच्या थंडीमध्ये गेल्या पाच दिवसापासून अन्न त्याग आमरण उपोषण सुरू केले असतांना संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाला आजपर्यत भेट सुद्धा दिली नव्हती परंतु पत्रकार येताच दे राजा तहसिलदार डोंगर जाळ मॅडम यांनी (Hunger strike) उपोषण कर्त्यास भेट देवून आश्वासन दिले की सर्व मागण्या वरिष्ठाकडे पाठवून लवकरात लवकरच बैठक बोलावून प्रश्न मार्गी लावू पण आपण उपोषण मागे घ्यावे असे सांगितले पण जर मागण्या न झाल्यास आणि उपोषण कर्त्याच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास याला संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार धरण्यात येईल असे म्हटले होते या घटनेची बातमी दै देशोन्नती मध्ये प्रकाशीत करण्यात आली आणि बातमी प्रकाशित होताच सर्वच विभागाचे अधिकारी यांनी उपोषणास भेटी दिल्या आणि ठाणेदार विकास पाटील तसेच अंढेरा सरपंच सौं आंबिलकर यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते.




 
			 
		

