Talodhi crime :- नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तळोधी (बा.)येथील सुभाष चौक येथील गोवार मोहल्यात गुरुवारी दि. १८ सकाळी ८.३० वाजता पतीने घरगुती वाद पत्नीसबोत करुन पत्नीच्या मानेवर चाकू हल्ला(knife attack) केल्याने पत्नी गंभीर जखमी झाली असून ब्रम्हपुरी येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
पत्नी गंभीर जखमी, आरोपीस अटक
आरोपी नामे प्रवीण वसंत पुसाम (३२) याने आज पत्नी भाग्यश्री प्रवीण पुसाम (२३) यांच्याशी वाद करुन त्याने पत्नीच्या मानेवर चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांनी पोलीस चमू सहीत घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाचे पंचनामे करण्यासाठी चंद्रपूर येथील फिंगर प्रिंन्ट चमू घटनास्थळी दाखल झालेली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तळोधी पोलीस स्टेशनचे(Police station) ठाणेदार राहुल गुहे करीत आहेत.