रावणवाडी पोलिसांची कारवाई!
गोंदिया (Illegal Pistol) : तालुक्यातील मंगरूटोला ते पांजरा मार्गावर एक इसम गावठी कट्टयासह वावरत असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर रावणवाडी पोलिसांनी (Rawanwadi Police) गस्त वाढवून संबधित इसमास ताब्यात घेवून झाडाझडती घेतली. दरम्यान त्याच्याकडे एक लोखंडी गावठी कट्टा (Gavathi Katta) सापडला. यावरून गुन्हा नोंद (Crime Record) त्या आरोपीला ताब्यात घेतले. राजु हिरालाल मेश्राम (42) रा.मंगरूटोला असे आरोपीचे नाव आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील मंगरूटोला (लंबाटोला) येथील राजु हिरालाल मेश्राम हा पिशवीत लोखंडी गावठी कट्टा घेवून वावरत होता. दरम्यान प्रकरणाची माहिती रावणवाडीचे पोनि वैभव पवार यांना मिळाली. या खात्रीशिर माहितीच्या आधारावर पोलिसांनी लंबाटोला ते पांजरा मार्गावर गस्त वाढविली. दरम्यान राजु हिरालाल मेश्राम हा हातात पांढरी पिशवी घेवून वावरता दिसून आला. त्याची झाडाझडती घेतली असता, अंदाजे 15 हजार रूपये किंमतीचा लोखंडी गावठी कट्टा दिसून आला. यावरून सदर आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याविरूध्द रावणवाडी पोलिस ठाण्यात (Rawanwadi Police Station) भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदाच्या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नावकार करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक गोरख भामरे (District Superintendent of Police Gorakh Bhamre) व वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि वैभव पवार यांच्या नेतृत्वात उपपोनि पुजा जाधव, पोहवा जगत बर्वे, गिरीश पांडे, सुशिल मल्लेवार, बुराडे, लेकुरवाडे, खरवडे यांनी केली.