परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील कारवाई
वाळू माफियावर कारवाईचा परिणाम शून्य
परभणी/गंगाखेड (Illegal sand Extraction) : तालुक्यातील भांबरवाडी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे समजताच नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्या पथकाने नदी पात्रातील तराफा जाळून नष्ट केला. मात्र या (Illegal sand Extraction) कारवाईचा वाळू माफियावर शून्य परिणाम होत असल्याने कठोर कारवाईची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे.
गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या भांबरवाडी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार ३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्यासह पथकातील सहाय्यक महसूल अधिकारी वैजनाथ फड, सुनिल चाफळे, उद्धव शिसोदे, अर्जुन आघाव, गुरुलिंग रेवडकर, एकनाथ शहाणे आदींनी भांबरवाडी शिवारात गोदावरी नदी पात्राकडे धाव घेतली तेंव्हा महसूल विभागाचे पथक नदी पात्राकडे येत असल्याची कुणकुण लागताच अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियानी अंदाजे (Illegal sand Extraction) एक ब्रास वाळू भरून ठेवलेला तराफा गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मध्यभागी सोडून पळ काढला.
गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मध्यभागी ठेवलेल्या तराफ्यातील वाळू नदी पात्रात खाली करून हा तराफा जप्त करत नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्या पथकाने गोदावरी नदी (Illegal sand Extraction) काठावर तराफा जाळून नष्ट केला. महसूल प्रशासनाने वाळू माफियाविरुद्ध केलेल्या या कारवाईचा वाळू माफियावर कुठलाच परिणाम झाला नसल्याचे व कारवाई करून महसूल प्रशासनाचे पथक परत फिरताच वाळू माफिया पुन्हा सक्रिय होत असल्याचे बोलून दाखवत गोदावरी नदी पात्रात सुरु असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून केली जात आहे.