परभणी (Illegal sand transport) : गंगाखेड येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार 30 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील खरबडा टी पॉईंटवर अवैध वाळू वाहतूकीचा टिप्पर पकडून गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध (Illegal sand transport) गुन्हा दाखल करत सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशाने व सपोनि पांडुरंग भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 30 मे रोजीच्या रात्री 8 वाजेच्या सुमारास माळसोन्ना परिसरात गस्तीवर असतांना पो.ह. लक्ष्मण कांगणे, पो.ह. निलेश परसोडे, पो.शि. परसराम गायकवाड, पो.शि. दिलीप निलपत्रेवार, पो. शि. शरद सावंत यांच्या पथकाला वझुर शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर खरबडा गावाकडे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगाखेड पोलीस ठाण्याचे पो.ह. मुंजा वाघमारे, पो.शि. भारत पवार यांना सोबत घेऊन खरबडा टी पॉईंट परिसरात सापळा लावून शुक्रवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक एमएच 34 एम 8997 पकडून पो. शि. शरद सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक शेख तौफिक शेख फेरोज रा. लोहगाव व मालक पिराजी मारोती ढेपे रा. परभणी या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अंदाजे सात लाख रुपये किंमतीचा टिप्पर व दहा हजार रुपये किंमतीची वाळू असा एकुण 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.