परभणी शहरातील पोलीस ठाण्याजवळील घटना
परभणी/गंगाखेड (Parbhani Crime) : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गॅरेज लाईनमधील चांद तारा मस्जिद समोरून दोन अनोळखी इसमांनी चालत्या स्कुटीवरून तीन लाख अठठ्यांशी हजार रुपयांची पिशवी पळविल्याची घटना बुधवार १२ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या (Parbhani Crime) घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पालम तालुक्यातील रावराजूर येथील माधव बालासाहेब शिंदे वय ६५ वर्ष यांनी मुलीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे देण्याकरिता दिनांक ११ मार्च रोजी शहरातील आय. सी.आय.सी.आय. बैंकेत सोने तारण ठेवून कर्ज काढले व मंजुर झालेल्या कर्जाची रक्कम ३, ८९, २१७ रुपये बँकेने भारतीय स्टेट बँकेतील बचत खात्यात वर्ग केल्याने बुधवार १२ मार्च रोजी माधव बालासाहेब शिंदे व त्यांचे मित्र मकरंद बळवंतराव जोशी यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास बँकेतुन काढलेले पैसे बँकेच्या बाहेर असलेल्या वाल्मीक बँकेच्या समोर बसून मोजत लाल रंगाच्या विशवीत पैसे ठेवून स्कुटीवरून नांदेड पुणे महामार्गवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले असता गॅरेज लाईन मधील चांदतारा मस्जिद जवळलील गतीरोधकाजवळ एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर बसून पाठीमागून आलेल्या अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन इसमांनी जवळ येताच माधव शिंदे यांच्या हातातील पैश्याची पिशवी हिसकावून घेत भरधाव वेगात परळी नाक्याकडे गेले.
यावेळी त्यांनी आरडा ओरडा केला, मात्र दोन्ही इसम पैशाची पिशवी (Parbhani Crime) घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. भर दिवसा शहरातील मुख्य स्त्यावर पोलीस ठाण्यापासून जवळच हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेवरून नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असुन यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचा तपास अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे शहर वासियांतुन पोलीसांच्या कार्य प्रणालीवरच प्रश्न उपस्थित केले जात आहे.