भंडारा (Truck-Bike Accident) : पवनी-भंडारा राज्यमार्गावर कोंढा येथे डॉ. अरुण मोटघरे कॉलेजजवळ बुधवार दि.२४ सप्टेंबर रोजी ८ ते ८:३० वाजेदरम्यान बंद असलेल्या उभ्या ट्रकला मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. यामुळे (Truck-Bike Accident) दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. मृताचे नाव देवीदास शिवराम उपरीकर (५०), रा. वाकेश्वर असे आहे.
देवीदास उपरिकर हे सेंद्री (खुर्द) येथे व नातेवाइकाकडे अंत्यविधीसाठी गेले होता. या रात्री दुचाकीने क्र.एमएच ४९/बी.झेड.१२५५ राहते गावी वाकेश्वरला जात असताना कोंढा येथील डॉ. अरुण मोटघरे कॉलेजजवळ रस्त्यावर ट्रक (क्र. एमएच ४० एसआर २९९८) उभा होता. तो दिसला नसल्याने त्यास मागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. (Truck-Bike Accident) याप्रकरणी अड्याळ पोलिसात मर्ग दाखल केला आहे.