बदलत्या वातावरणाचा परिणाम!
मानोरा (Gov Rural Hospital) : तालुक्यात वातावरण बदलाने साथरोगांचा संचार झाल्याने शहरासह तालुक्यात आबाल वृद्धांना संसर्गजन्य ताप, खोकल्याने ग्रासले आहे. शासकीय सामान्य ग्रामीण रुग्णालयात दररोज ३५० ओपीडी जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ साजिद खान यांनी दिली.
ढगाळ वातावरण व परतीच्या अवकाळी मुसळधार पावसामुळे डोकेदुखी, ताप साथरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे. गत आठवडाभरापासून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही घरोघरी सर्दी, खोकला, अंगदुखी, तापाचे रुग्ण आढळत आहेत. यात बालके व वयोवृद्ध रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ असुन ग्रामीण रुग्णालयांसह खासगी दवाखाने साथरोगाच्या रुग्णांनी फुल्ल दिसत आहेत. सद्यास्थितीत (Gov Rural Hospital) ग्रामीण रुग्णालयात दररोज ३५० ओपीडीत वाढ झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांची ओपीडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. (Gov Rural Hospital) विशेषतः स्वच्छता घेण्यासोबतच पाणी उकळून प्यावे. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ साजिद खान व प्रहार रुग्ण कल्याण समिती जिल्हाध्यक्ष नितेश लवटे यांनी केले आहे.




 
			 
		

