यवतमाळ (Husband Murder Case) : शहरालगत असलेल्या चौसाळा जंगलातील खूनाचे रहस्य २० मे रोजी उघड झाले होते या प्रकरणातील मुख्य आरोपी निधी देशमुख तिवारी हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर (Husband Murder Case) खुनाच्या घटनेत सहभागी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
सनराईज शाळेच्या मुख्याध्यापकेच्या क्रृरतेचा शिक्षक पति बळी ठरला आहे.सनराईज इंग्लीश मिडीयम स्कूल महाविर नगर यवतमाळ येथे मृतक शंतनु देशमुख शिक्षक होते व आरोपी निधी देशमुख हिचेकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार होता. तेव्हा त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याने त्यांचा एक वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला. ते दोघे दारव्हा रोडवरील सुयोग नगर येथे भाड्याचे राहात होते.
मात्र पति पत्नीच्या भांडणातून पत्नीने निधी देशमुख हीने अत्यंत शांत डोक्याने विषप्रयोग करून शंतनुचा खून केला व शाळेतली विद्यार्थ्यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती ही घटना १३ मे रोजी घडली होती मात्र. हा प्रकार १५ मे रोजी उघडकीस आला होता. या (Husband Murder Case) अत्यंत विचित्र हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी खुप मेहनत घेतली जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतिश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मन्वर व त्यांच्या पथकाने शहरालगतचे सर्व खेडेपाडे शहरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणे, शहरातील पेट्रोल पंप, बार या सर्व ठिकाणी चौकशी केली.
शेवटीदारव्हा रोड वरील एकविरा चौकात बसणार्या मुलांमधील एक व्यक्ती नामे शंतनु अरविंद देशमुख वय ३२ वर्ष, शिक्षक सनराईज इंग्लीश मिडीयम स्कुल, यवतमाळ, रा. सुयोग नगर, यवतमाळ हा काही दिवसांपासुन येत नसल्याचे त्यांना कळल्याने त्या मित्रांनी शंतनु देशमुख याचे घरी जाऊन त्याचे पत्नीकडे चौकशी केली तिथूनच या हत्येचा उलगडा झाला.